भाजप प्रवेशाच्या दबावातून ‘त्या’ खासदाराची आत्महत्या ? काँग्रेसकडून चौकशीची मागणी

मुंबई – मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदार मृतावस्थेत सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. दमण आणि दीवचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हच्या एका हॉलेलमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आहे. खासदार डेलकर यांच्याजवळ गुजरातीत लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली होती. या सुसाईड नोटमध्ये भाजपच्या बड्या नेत्याचं नाव असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तसेच खासदार डेलकर यांच्यावर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, असा दावाही काँग्रेसने केला आहे.

भाजप स्थानिक नेत्यांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी डेलकर यांनी यापूर्वी केल्या होत्या. भाजपचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी लिहिलेल्या 16 पानी सुसाईड नोटमध्ये आहे, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केला. सचिन सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत तपास करण्याची मागणी केली.

स्थानिक भाजप नेत्यांकडून आपल्यावर खोट्या केसेस टाकल्या जात आहेत, अशा तक्रारी मोहन डेलकर यांनी यापूर्वी केल्या होत्या. भाजपचे माजी आमदार प्रफुल्ल पटेल यांचं नाव डेलकर यांनी आपल्या 16 पानी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. भाजप नेते प्रफुल्ल पटेल सध्या दादरा नगर हवेलीत प्रशासक आहेत. डेलकरांवर भाजपमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात होता. त्यांनी मुंबईत आत्महत्या केली. दादरा व नगर हवेलीत आत्महत्या केली असती, तर मृत्यूनंतर त्यांना न्याय मिळाला नसता, असं त्यांना कदाचित वाटलं असेल, असा अंदाजही सचिन सावंत यांनी वर्तवला.

1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले आणि खासदार झाले. त्यानंतर भारतीय नवशक्ती पार्टीकडून ते निवडणूक लढले. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. 2019 ची निवडणूक ते अपक्ष म्हणूनच लढले होते आणि जिंकले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.