यशराज फिल्म्सद्वारा निर्मित एका आगामी कॉमेडी चित्रपटात अभिनेता विक्की कौशल आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर यांची जोडी झळकणार आहे. हा चित्रपट मानुषीने साइन केला असल्याचे समजते. ती एक आउटसाइडर असून तिने 2017 मध्ये मिस वर्ल्डचा बहुमान पटकावला होता.
तसेच तिला “पृथ्वीराज’मध्येही काम करण्याची संधी मिळाली होती. विशेष म्हणजे, यश राज फिल्म्सचा हा चित्रपट 50वा प्रोजेक्ट असून ज्यात अन्य अनेक चित्रपटांची घोषणा करण्यात येणार आहे.
यश राज फिल्म्सद्वारा स्वातंत्र्यदिनी आदित्य चोप्रा यांनी सांगितले की, दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा अर्थात माझे वडील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त 27 डिसेंबर रोजी प्रोडक्शन हाऊसकडून निर्मित अनेक योजनांची घोषणा करण्यात येणार आहे. ही घोषणा बॅनरच्या 50व्या वर्धापनदिनानिमित्तही करण्यात येईल.
विक्की आणि मानुषी अभिनित हा चित्रपट यश राज बॅनरखालील बिग बजेट चित्रपट असणार आहे. या चित्रपट आणि कास्टिंगबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. याशिवाय यश राज बॅनरअंतर्गत “बंटी और बबली-2′, “शमशेरा’, “जयेशभाई जोरदार’ आणि “संदीप और पिंकी फरार’ आदी चित्रपट साकारण्यात येणार आहे.