बीजिंग – चिनी भाषेचे प्रसिद्ध तज्ज्ञ जानकी बल्लभ यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. (Veteran Sinologist Janaki Ballabh passes away in Beijing) ते 94 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांच्यावतीने सांगण्यात आले. आपल्या कुटुंबियांसमवेत चीनमध्ये सर्वात जास्त काळ मुक्काम केलेले ते पहिले आणि एकमेव भारतीय होते.
जानकी बल्लभ यांचा जन्म उत्तराखंडमधील दलाकोट गावात झाला होता. 1956 मध्ये हिंदी भाषा तज्ज्ञ म्हणून ते चीनला गेले होते. तेंव्हापासून ते चीनमध्येच रहात होते. चिनी भाषेवर प्रभुत्व मिळवून जानकी बल्लभ यांनी अनेक महत्वाच्या पुस्तकांचा हिंदीत अनुवाद केला.
यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे संस्थापक माओ झेडोंग यांनी लिहीलेल्या “सिलेक्टेड वर्क्स’ बरोबर अनेक गाजलेल्या लेखकांचे लेख, कविता, कादंबऱ्या आणि समिक्षा आदी लेखन संपदा हिंदीमध्ये अनुवादित केली होती.
Economy : भारताच्या परकीय चलनसाठ्यात घसरण, RBIची सुधारित आकडेवारी जाहीर
अलिकडच्या काळात त्यांनी विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लिहीलेले “द गव्हर्नमेंट ऑफ चायना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडाचा हिंदी अनुवाद देखील पूर्ण केला होता. जानकी बल्लभ यांना 1961 साली चीनचे तत्कालिन अध्यक्ष चौ एन लाय यांच्या हस्ते “पीस ऍन्ड फ्रेन्डशीप ऍवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले होते. त्यांच्या पत्नी शामा बल्लभ या रेडिओ बीजिंगवरील पहिल्या हिंदी उद्घोषिका होत्या.