नवी दिल्ली :– 23 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलनसाठा 691 दशलक्ष डॉलर्सनी घसरून 562.808 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे, असे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीत दिसून आले आहे.
त्याच्या आधीच्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा 563.499 अब्ज डॉलर्स इतका होता. सोन्याचा साठा मात्र 390 दशलक्ष डॉलरने वाढून 40.996 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
BJPvsINC : …त्यामुळे एका अर्थाने ‘भाजप’ही माझा गुरूच – राहुल गांधी
2022 सालाच्या सुरुवातीला देशाचा एकूण परकीय चलनसाठा 633.61 अब्ज डॉलर्स इतका होता. त्यानंतरच्या काळात मात्र हा साठा नियमितपणे घसरतानाच दिसतो आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया परकीय चलन बाजारावर बारकाईने लक्ष ठेवते आणि बाजाराची सुव्यवस्थित स्थिती राखण्यासाठी हस्तक्षेप करते.