खेड-शिवापूर -राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सभागृहामधे छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करू नये, असे खासदर उदयनराजे भोसले यांना सुनावले.
त्यांच्या या वक्तव्याचा हवेली तालुका तहसीलदार कार्यालयामधे हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच हवेली तालुका प्रमुख गणपत खाटपे आणि तालुका प्रमुख संदीप मोडक यांनी जाहीर निषेध केला असून, तहसीलदार संजय भोसले यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
याप्रसंगी पोपट चोरघे, तानाजी पवळे, संतोष शेलार, बालकृष्ण वांजळे, रमेश भोसले, उत्तम गोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.