पुणे – मार्केट यार्डातील तरकारी विभागात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मागणी आणि पुरवठा यांच्यातील समतोलामुळे सर्वच फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
रविवारी मार्केटयार्डात 80 ते 90 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून 11 ते 12 टेम्पो गाजर, गुजराथ आणि कर्नाटक येथून 5 ते 6 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि राजस्थान येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथून मटार 14 ते 15 ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात 5 ते 6 ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक मिळून बटाट्याची 40 ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 1200 ते 1300 गोणी, कोबी सुमारे 8 ते 10 टेम्पो, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार पेटी, भुईमूग शेंगा 50 ते 55 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, नवीन कांदा 100 ट्रक, तर जुना कांदा 25 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 200-320, बटाटा : 80-150, लसूण : 500-1000, आले : सातारी 150-200, भेंडी : 250-300, गवार : 400-500, टोमॅटो : 40-60, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 250-500, दुधी भोपळा : 80-120, चवळी: 150- 200, काकडी : 150-200, कारली हिरवी 200-220, पांढरी 150-160, पापडी : 250-300, पडवळ : 180-200, प्लॉवर: 80-120, कोबी : 30-50, वांगी : 150-200, डिंगरी : 150-200, नवलकोल : 50-60, ढोबळी मिरची : 180-220, तोंडली : कळी 250-280, जाड, 100-120, शेवगा : 400-450, गाजर 130-160, वालवर 300-350, बीट : 50-60, घेवडा : 200-250, कोहळा : 100-120, आर्वी : 180- 200, घोसावळे : 200-250, ढेमसे : 200-250, भुईमूग शेंग : 400-500, मटार : स्थानिक : 250, परराज्य 180-130, पावटा : 200-250, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, नारळ : शेकडा 1000-1600, मका कणीस : 60-120.