शोभिवंत फुलांच्या मागणी, पुरवठा यातील समतोलामुळे भाव स्थिर

येत्या पंधरवड्यात व्हेलेंटाईन डे येत असल्याने गुलाबांच्या मागणी, भावात वाढ होण्याची शक्यता

 

पुणे – फुलांची आवक कमी प्रमाणात होत आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडूची आवक घटल्याने फुलांच्या भावात वाढ झाली होती. त्यानंतर रविवारी आवक पूर्वपदावर आल्याने भाव पूर्ववत झाले.

सुट्ट्या फुलांसह शोभिवंत फुलांच्या मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे सर्व फुलांचे भाव स्थिर आहेत. दरम्यान, येत्या पंधरवड्यात विविध डेंसह व्हेलेंटाईन डे येत आहेत.

याकाळात डच गुलाबांच्या मागणीत तसेच भावात वाढ होईल, असा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्‍त करण्यात आला.

 

फुलांचे प्रतिकिलोचे भाव

झेंडू : 30-40, गुलछडी : 160-200, ऍष्टर : जुडी 6-8, सुट्टा 40-60, कापरी : 20-30, शेवंती : 80-100, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : 20-30, गुलछडी काडी : 20-50, डच गुलाब (20 नग) : 50-100, जर्बेरा : 10-20, कार्नेशियन : 60- 80, शेवंती काडी 60-120, लिलियम (10 काड्या) 800-1500, ऑर्चिड 300-500, ग्लॅडिओ (10 काड्या) : 20-30.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.