- कोथिंबीर, राजगिरा आणि हरभरा गड्डीच्या भावात वाढ
पुणे – आवक वाढल्यामुळे मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, चुका, चवळई आणि पालकच्या भावात घट झाली आहे. तर, मागणी वाढल्यामुळे कोथिंबीर, राजगिरा आणि हरभरा गड्डीच्या भावात वाढ झाली. तर, मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे शेपू, करडई, पुदीना, अंबाडी आणि मुळे यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
घाऊक बाजारात मेथीचे भाव 2 रुपये, कांदापात 6 रुपये, चाकवत 3 रुपये, चुका 4 रुपये, चवळई 6 रुपये आणि पालक 4 रुपयांनी जुडीमागे उतरले आहेत. तर, कोथिंबिर, राजगिरा आणि हरभरा गड्डीचे भाव प्रत्येकी एक रुपयांनी वाढले आहेत. येथील बाजारात रविवारी कोथिंबिरीची दीड लाख, मेथीची 1 लाख, तर हरभरा गड्डीची 50 हजार जुडींची आवक झाली.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)
कोथिंबीर : 200 – 800, मेथी : 200-700, शेपू : 300-600, कांदापात : 700-1000, चाकवत : 300-400, करडई : 500-600, पुदीना 200-300, अंबाडी 500- 600, मुळे : 800-1200, राजगिरा : 300-500, चुका 300-400, चवळई : 300-400, पालक : 400-600, हरभरा गड्डी : 400-700.