पुणे – नवनाथ शेटे स्पोर्टस अकादमी व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 12 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटातील पहिल्या पीएमडीटीए केपीआयटी लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात आरव मुळ्ये, नील देसाई तर, मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अनुष्का जोगळेकर या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का देत आजचा दिवस गाजवला.
या स्पर्धेत मुलांच्या गटात बिगरमानांकित आरव मुळ्येने आठव्या मानांकित शौनक रणपिसेचा 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला. नील देसाई याने सातव्या मानांकित अभंग फडणीसचा टायब्रेकमध्ये 6-5(3) असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत अनुष्का जोगळेकर हिने काव्या तुपेचा टायब्रेकमध्ये 6-5(7-4) असा तर, तिसऱ्या मानांकित ध्रुवा मानेने स्वरा जावळेचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल – मुले – दुसरी फेरी – शौनक सुवर्णा (1) वि. वि. जतीन भोरटाके 6-2. नील देसाई वि. वि. अभंग फडणीस (7) 6-5 (3). आरव मुळ्ये वि. वि. शौनक रणपिसे (8) 6-1. क्रिशांक जोशी (3) वि. वि. रोहन बोराडे 6-0. समिहन देशमुख (4) वि. वि. प्रांशु नानापंवर 6-3. अर्जुन वेलूरी (5) वि. वि. आरुष पोतदार 6-0. सनथ कडले वि. वि. श्रेयश गवारी 6-0. अहान सारस्वत (6) वि. वि. तकशील नगर 6-0.
मुली – ह्रितीका कापले (1) वि. वि. श्रीया होंकन 6-2. अनुष्का जोगळेकर वि. वि. काव्या तुपे 6-5 (7-4). ध्रुवा माने (3) वि. वि. स्वरा जावळे 6-4. सान्वी तंपी वि. वि. अन्विता कांदेकर 6-2. सृष्टी सुर्यवंशी वि. वि. सरीशा जमेनिस 6-1.