पुणे – मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मात्र, त्या तुलनेत मागणी वाढल्याने दुधी भोपळा, काकडी, हिरवी मिरची आणि मटारच्या भावात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली. तर, सिमला मिरची आणि कांदाच्या भावात घट झाली. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
येथील बाजारात रविवारी 80 ते 90 गाड्यांची आवक झाली. परराज्यातूत आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून 10 ते 11 टेम्पो गाजर, गुजरात आणि कर्नाटक येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 4 ते 5 टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि राजस्थान येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथून मटार 11 ते 12 ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरात येथून 7 ते 8 ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक मिळून बटाट्याची 30 ते 35 ट्रक इतकी आवक झाली आहे.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 1500 ते 1600 गोणी, कोबी सुमारे 7 ते 8 टेम्पो, प्लॉवर 10 ते 12 टेम्पो, भेंडी 7 ते 8 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 10 ते 12 हजार पेटी, भुईमूग शेंगा 50 ते 55 पोती, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, नवीन कांदा 140 ट्रक, तर जुना कांदा 30 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 220-270, बटाटा : 80-160, लसून : 500-1000, आले : सातारी 100-200, भेंडी : 250-300, गवार : 350-400, टोमॅटो : 40-60, दोडका : 200-250, हिरवी मिरची : 300-500, दुधी भोपळा : 100-150, चवळी : 200- 250, काकडी : 120-160, कारली हिरवी 200-250, पांढरी 180-200, पापडी : 250-300, पडवळ : 180-220, प्लॉवर : 60-80, कोबी : 30-50, वांगी : 150-250, डिंगरी : 180-200, नवलकोल: 60-80, ढोबळी मिरची : 160 -200, तोंडली : कळी 250-300, जाड, 120-150, शेवगा : 450-550, गाजर 140-160, वालवर 250-300, बीट : 40-60, घेवडा : 300-350, कोहळा : 100-120, आर्वी : 150- 160, घोसावळे : 180-200, ढेमसे : 200-250, भुईमूग शेंग : 400-500, मटार : स्थानिक : 250-260, परराज्य 200-240, पावटा : 250-300, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 180-200, नारळ : शेकडा 1000-1600, मका कणीस : 60-120.