मुंबई – अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपे आहेत. दोघांची केवळ ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही खूप आवडली आहे. ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा असून चाहतेही त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, एकदा वरुण धवनमुळे सिद्धार्थ मल्होत्रा कियारा अडवाणीवर चिडल्याची बातमी समोर आली आहे.
स्पॉटबॉयने एका रिपोर्टच्या आधारे सांगितले की, वरुण धवनने एकदा कियाराला किस केले होते, ज्यामुळे सिद्धार्थ मल्होत्रा त्याच्या लव्ह लेडीवर खूप चिडला होता. दरम्यान, असे घडले की ‘जुग जुग जिओ’च्या प्रमोशनदरम्यान वरुण धवन आणि कियारा फोटोशूटसाठी पोज देत होते. यावेळी, वरुण धवनने अचानक कियारा अडवाणीच्या गालावर चुंबन घेतले, ज्यामुळे कियाराला धक्का बसला, अशात तिने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यादरम्यान एक व्हिडिओही व्हायरल होत आहे.
रिपोर्टनुसार, सिद्धार्थ मल्होत्रा वरुण धवनवर चिडला की दिग्दर्शकाच्या सूचनेशिवाय तो कियाराला किस करू शकतो. वरुणमुळे सिद्धार्थही कियारावर चिडला होता. मात्र, नंतर हुशारीने वागून दोघांनीही आपलं नातं घट्ट करायचं ठरवलं.
वृत्तानुसार, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नापूर्वीच्या हळदीसाठी कुटुंबातील सदस्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सिद्धार्थ कियारा यांच्या प्री-वेडिंग फंक्शन म्हणजेच हळदी, मेहेंदी आणि संगीताच्या तारखा पुढील महिन्यात ४ फेब्रुवारी आणि ५ फेब्रुवारी निश्चित केल्या आहेत. तसेच, 6 फेब्रुवारी 2023 रोजी सिड-कियारा सात फेऱ्या घेऊ शकतात.