Bollywood News । बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर आता पडद्यावर नवी प्रेमकथा सादर करणार आहे. करणने दिग्दर्शकाने सोशल मीडियावर आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केलीये.
करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केलाय यासोबतच चित्रपटाची तारीखही जाहीर केली आहे. ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ असे या चित्रपटाचे नाव आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर आणि वरुण धवनची जोडी पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना करणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुमचा सनी संस्कारी त्याची तुलसी कुमारी शोधण्याच्या मार्गावर आहे.. मनोरंजनाने भरलेली ही प्रेमकथा मोठ्या पडद्यावर येत आहे..’
हा चित्रपट पुढील वर्षी 8 एप्रिल रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याआधी वरुण आणि जान्हवी शेवटचे ‘बावल’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
हा चित्रपट शशांक खेतान दिग्दर्शित करणार आहे. या चित्रपटातील अन् स्टार कास्टची माहिती देण्यात आलेली नाही. वरुण सनीच्या भूमिकेत तर जान्हवी तुलसीच्या भूमिकेत दिसणार आहे. काही सेकंदांचा हा व्हिडीओ पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की चित्रपटाचे कथानक बद्रीनाथ की दुल्हनियासारखे असू शकते. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी रिलीज होणार आहे.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर वरुण आता बेबी जॉन नावाच्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती जवान चित्रपट दिग्दर्शक ऍटली करत आहेत.
हेही वाचा
bollywood news । श्रिया सरनसाठी शूटिंग करणे झाले कठीण