रेडा – इंदापूर येथील भीमाई आश्रम शाळेत राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन ट्रस्टचे अध्यक्ष रत्नाकर मखरे, संचालिका शकुंतला मखरे व विद्यार्थिनी शिफा मुल्ला यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षणाला पर्याय नाही हे अचूकपणे जाणले होते आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासचे धोरणे आखले. बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण बहुजन बांधवांसाठी खुले केले.
समाजातील शोषित व मागास वर्गाला आरक्षण देण्याची कल्पनाही त्यांनी मांडली. समाजातील विषमता, भेदाभेद नष्ट करण्यासाठी त्यांना उच्चवर्णीयांचा विरोध सहन करावा लागला; पण या विरोधाला न जुमानता त्यांनी आपले कार्य पूर्णत्वास नेले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे सचिव ऍड. समीर मखरे, गोरख तिकोटे व सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.