पिंपरी – निसर्ग सौंदर्याने नटलेलं मावळ तालुक्यातील निसर्गाचं एक रूप आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे किल्ले लोहगड आणि विसापूर त्यावर पसरलेली धुक्याची दाट चादर… त्यात पावसानं दिलेली उघडीप किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या येळसे (प्रभाचिवाडी) या परिसरात शेतकरी राजा सर्जा-राजा सोबत आपल्या शेतीची नांगरणीची लगबग सुरू असताना दैनिक प्रभातचे वाचक सागर ठाकर यांनी टिपलेलं विलोभनीय दृश्य.