पणजी: यंदा इफ्फी ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इंटरऍक्टिव्ह डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शन राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, पुणे (NFAI) यांनी हे प्रदर्शन तयार केले आहे. इफि चा संपूर्ण ५० वर्षांचा प्रवास दाखवणारे मल्टिमीडिया असे हे डिजिटल प्रदर्शन कला अकादमी परिसरात २८ नोव्हेंरपर्यंत प्रेक्षकांना खुले आहे.
या सुवर्ण महोत्सवी इफ्फी मध्ये यंदा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालया तर्फे भरविण्यात आलेल्या मल्टिमीडिया डिजिटल प्रदर्शनाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. एकूणच हे मल्टिमीडिया डिजिटल प्रदर्शन नेमकं काय आहे आणि यामागची कल्पना काय आहे, याची माहिती रिजनल आऊटरिच ब्युरो, पुणेचे जॉईंट डायरेक्टर संतोष अजमेरा यांनी खास डिजिटल प्रभात साठी दिली आहे.