वाराणसी – काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या वादावर वाराणसी जिल्हा न्यायालयातील दोन्ही बाजूंचे युक्तीवाद आज पूर्ण झाले. या प्रकरणावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. सुनावणीची पुढील तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे.
न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आलेले व्हिडीओ चित्रीकरण आणि छायाचित्रांच्या प्रती न्यायालयाकडे मागण्यासाठी अर्ज केला गेला आहे, असे हिंदूंच्या बाजूचे वकील ऍड विष्णू जैन यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणामध्ये कोणताही हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता आणि हे प्रकरण जिल्हा न्यायालयाकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीसाठी 4 याचिकाकर्ते आणि 19 वकील अशा एकूण 23 जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती.