नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांचे देशाच्या राजकारणात तगडे योगदान आहे. राजकीय क्षेत्रात ते नावाजलेले नेते म्हणून ओळखले जातात. मोदींच्या अत्यंत निकटवर्तीय असणारे अमित शाह भाजपचे चाणक्य म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. आजच्या व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अमित शाह यांच्या वैवाहिक आयुष्याविषयी आणि त्यांच्या पत्नीविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊ…
मुंबईच्या एका सर्व संपन्न गुजराती जैन कुटूंबात अमित शाह यांचा जन्म झाला. आज ते देशाचे गृहमंत्री आहेत. जितकं त्यांचं राजकीय आयुष्य चर्चेत राहले तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहले.
भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांची प्रेम कहानी अनोखी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अमित शाह हे त्यांच्या पत्नी सोनल यांना पाहून पहिल्या नजरेतच त्यांच्या प्रेमात पडले. अमित शाह यांनी वयाच्या 23 व्या वर्षी लग्न केले. त्यांची पत्नी सोनल शाह यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. अमित शाह यांनी खरं तर अरेंज मॅरेज केलंय मात्र सोनल यांना पहिल्यांदा पाहिल्यानंतरच ते त्यांच्या प्रेमात पडले होते.
सोनल यांचा जन्म कोल्हापुरमध्ये झाला होता. सोनल यांनी राजकुमारी पद्मराजे गल्र्स हाय स्कूल, कोल्हापुर येथून आपले शिक्षण घेतले. येत्या येत्या १९ तारखेला अमित शहा त्यांच्या पत्नीच्या शाळेला भेट देणार आहे. शाळा सोडल्यानंतर सोनल या तब्बल ३५ वर्षांनंतर मैत्रिणींचा मेळा भरला असताना आल्या होत्याय या प्रसंगी त्यांनी शाळेला पाच लाखांचा धनादेश दिला होता.
पद्माराजे हायस्कूल त्यांच्यासाठी दुसरे घरच आहे. शिक्षिकांनी केलेल्या संस्कारांमुळेच त्या एक उत्तम चांगली गृहिणी होऊ शकल्या, असं त्या नेहमी म्हणतात.
सोनल आणि अमित शाह यांच्या ३७ वर्षाच्या संसारात अनेक चढ उतार आले. मग ते राजकीय असो की वैयक्तिक आयुष्यात सोनल या नेहमी खंबीरपणे अमित शाह यांच्यासोबत उभ्या राहल्या. या दोघांना एक मुलगा आहे, जय शाह. जय हे सध्या बीसीसीआयचे सचिव आहे.