पॅरिस : प्रेमाचा दिवस म्हणून ओळख झालेला ‘व्हॅलेंटाईन डे’ जगाच्या पाठीवर सर्वत्र विविध प्रकारे साजरा केला जातो. असे मुहूर्त साधून अनेक जोडपी लग्न करतात किंवा साखरपुडा करून नियोजनही करता प्रत्येक देशाची ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरे करण्याची पद्धत वेगळी आहे.
जगाच्या पाठीवरील मुस्लिम देशांमध्ये व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यात येत होता. तेथील शासक ‘व्हेलेंटाईन डे’ साजरा करण्यात परवानगी देत नव्हते पण 2018 पासून दुबईमध्ये परवानगी देण्यात आली तेथील महिला युवक आणि युवती सुद्धा हा सण साजरा करु लागले आहेत.
इंग्लंडमध्ये तरुण मुली व्हॅलेंटाईन डेच्या आधल्या रात्री झोपताना आपल्या उशीखाली तेज पत्त्याची पाच पाने ठेवतात उशीच्या चारी कोपऱ्यामध्ये एक आणि मध्ये एक अशाप्रकारे ही पाने ठेवून त्यावर उशी ठेवली जाते त्यामुळे रात्री स्वप्नात आपल्या जोडीदाराचे दर्शन होते अशी भावना असते.
सर्वात प्रथम ‘व्हॅलेंटाईन डे’ फ्रान्समध्ये साजरा करण्यात आला फ्रान्समध्ये सुद्धा आजही ‘व्हॅलेंटाईन’ नावाचं एक गाव असून त्याला व्हिलेज ऑफ लव नावाने ओळखले जाते.
डेन्मार्कमध्ये तरुण मुले मुलींना रेड रोज देऊ शकत नाहीत त्या बदल्यात ड्रॉपर नावाचे एक आकर्षक फूल मुलांकडून मुलींना दिले जाते
ब्राझीलमध्ये मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात नाही तर तो 12 जून रोजी साजरा केला जातो. इटलीमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ स्प्रिंग फेस्टिवल या नावाने ओळखला जातो. या दिवशी तरुण मुली सकाळी आठ वाजता उठतात आणि उठल्यानंतर पहिल्यांदा ज्या पुरुषाचे दर्शन त्यांना होते तो आपला जोडीदार असेल अशी त्यांची भावना असते.
जपानमध्ये मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘थँक्स गिविंग डे’ म्हणून साजरा केला जातो या दिवशी पती आणि पत्ती एकमेकांचे आभार मानतात त्याचबरोबर एकमेकांशी नाते संबंध असणार्या व्यक्तीही नातेसंबंध जपल्याबद्दल एकमेकांचे आभार मानण्याचे काम करतात.
थायलंडमध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी हत्तीवर बसून लग्न करण्याची प्रथा आहे हा समारंभ होत असताना लग्नाचे सर्टिफिकेट देणारा अधिकारी सुद्धा हत्तीवर बसूनच या सर्टिफिकेट वर सही करतो.
फिलिपाईन्समध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ दिवशी लग्न करणाऱ्या जोडप्यांचे लग्न सरकारतर्फे प्रायोजित केले जाते. लग्नाचा सर्व खर्च सरकार करते
इराण आणि मलेशियात मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यावर बंदी आहे. इराणमध्ये या दिवशी हा दिवस कृतज्ञता दिवस म्हणून साजरा केला जातो आणि मलेशियात जर कोणी व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसला तर त्याला त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येते.