मुंबई – बॉलीवूडमधील परफेक्ट मॅन अर्थात अभिनेता आमीर खानची मुलगी इरा खान रिलेशनशिपमध्ये आहे. ती वडिलांचे फिटनेस कोच नुपूर शिखर यांना डेट करत आहे. याबाबत नुपूरने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना हिंट दिली. गतवर्षी इरा खानचे एक्स-बॉयफ्रेंड मिशाल कृपलानीसोबत फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते.
View this post on Instagram
मात्र, आता व्हॅलेन्टाइनचं औचित्य साधून इराने नुपूरसोबतचे काही रोमॅण्टिक फोटो सोशलवर शेअर केले आहेत. नुपूरबरोबरच्या फोटोतून इरा पुन्हा प्रेमात पडल्याचे दर्शवित आहेत. लॉकडाऊन काळापासून इरा खान आणि नुपूर शिखर हे एकमेकांना डेट करत आहेत.
View this post on Instagram
जेव्हा इरा खान फिटनेसकडे वळली तेव्हा या दोघांची जवळीक वाढली. अलीकडे महाबळेश्वरमधील फार्महाऊस येथे इरा आणि नुपूर सुट्टीसाठी आले होते. यावेळी दोघांनीही एकमेकांच्या आईची भेट घेतली होती. असे म्हटले जात आहे की ते दोघेही या नात्याबाबत अतिशय गंभीर आहेत.
View this post on Instagram
नुपूर शिखरे हा व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो इराला ट्रेन करत आहे. इराने ट्रेनिंग दरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नुपूर फक्त इरालाच नाही तर परफेक्शनिस्ट आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर आहे. तसेच नुपूर दशकापासून अभिनेत्री सुश्मिता सेनसोबत तिचा फिटनेस ट्रेनर म्हणून काम करत आहे.
View this post on Instagram
गेल्यावर्षी इरा आणि नुपूर यांनी एकत्र दिवाळी आणि नाताळ असे सण एकत्र साजरे केले. नुपूरने या दिवसांचे फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे इराने तिचा टॅटू आर्टिस्टचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर नुपूरच्या हातावर पहिला टॅटू गोंदवला होता.
View this post on Instagram