वैराग स्टेशनचा पोलीस नाईक लाच स्वीकारताना अटकेत

सोलापूर (प्रतिनिधी) – वैराग पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक महेश सतीश पवार (वय 32) याला 60 हजाराची लाच स्वीकारताना सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

यातील तक्रारदार सैनिकाच्या मेव्हणे आणि इतर साथीदारांच्या विरोधात वैराग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून ते सध्या पोलीस कोठडीत आहे. त्यांची पोलीस कोठडी वाढवून न घेण्यासाठी तसेच त्यांना गुन्ह्यात तपासात मदत करण्यासाठी पोलीस नाईक महेश पवार याने लाचेची मागणी करून 60 हजार रुपये रोख स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपअधीक्षक अजितकुमार जाधव, कविता मुसळे,पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलकंठ जाधवर, चंद्रकांत पवार, सिद्धाराम देशमुख, प्रफुल्ल जानराव, शाम सुरवस आदींनी पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.