वडगाव मावळ – महात्मा जोतिबा फुले यांच्याविषयी मनोहर भिडे यांनी बेताल वक्तव्य केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग मावळ तालुक्याच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.भिडे यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी अंदोलनकर्त्यांनी केली. मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना या आशयाचे निवेदन देण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून भिडे यांच्याकडून महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य वाढत चालली आहेत. हे लवकर थांबवावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष विकी लोखंडे यांनी दिला.
यावेळी माजी नगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, महिला तालुकाध्यक्षा दीपाली गराडे, सामाजिक न्याय विभागाच्या महिलाध्यक्षा ज्योती आंबेकर, कार्याध्यक्षा मनिषा रघुवंशी, तळेगाव शहराध्यक्षा शैलेजा काळोखे, ज्योती शिंदे, जयश्री गोठे, मावळ तालुकाध्यक्ष सागर भालेराव, कार्याध्यक्ष तेजस बनसोडे, महेश रघुवंशी, भाऊ ढोरे, वडगाव अध्यक्ष गणेश पाटोळे, सागर पाटोळे, किरण ओव्हाळ अजय भालेराव, आशिष भालेराव उपस्थित होते.