उत्तरकाशी – 12 दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्याच्या ऑपरेशनला (rescue of laborers) पुन्हा अडथळा आला. त्यामुळे बचावकार्य काही काळ थांबल्याने मजुरांच्या सुटकेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Uttarkashi Tunnel Rescue)
संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ड्रिलिंगबाबत असलेली तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. यानंतर अनेक तास थांबवलेले बचावकार्य शुक्रवारी सुरू करण्यात आले असून सिल्कियारा बोगद्यात ड्रिलिंग करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
ऑगर मशिनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण नाही. परंतु ज्या प्लॅटफॉर्मवर ते बसवले आहे ते मजबुत करण्यासाठी बचाव कामगारांची गरज आहे. तसेच बोगद्याच्या कोसळलेल्या भागाच्या ढिगाऱ्यातून पाच मीटरपर्यंत कोणतेही धातूचे अडथळे नाहीत, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी पाईपचे आणखी सहा मीटरचे दोन भाग टाकायचे आहेत. आम्हाला अजून 12-14 मीटर जायचे आहे आणि आम्हाला आशा आहे की जर सर्व काही ठीक झाल्यास लवकरच ऑपरेशन पूर्ण करू, असे त्यांनी सांगितले.