India vs Australia 2nd T20 Cricket Match Live Streaming : भारत-ऑस्ट्रेलिया याच्यांतील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा एक चेंडू राखून पराभव केला. गुरुवारी (23 नोव्हेंबर) विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 240 धावा केल्या, प्रत्युत्तरात भारतीय संघाने 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत 80 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात जोस इंग्लिसने 50 चेंडूत 110 धावा केल्या होत्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना केरळमधील तिरुवनंतपुरम शहरात खेळवला जाणार आहे. येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. 26 नोव्हेंबर (रविवार) संध्याकाळी 7 वाजता सामन्यातील पहिला चेंडू टाकला जाईल.
ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आतापर्यंत फक्त तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या तीन सामन्यांमध्ये धावांचा पाठलाग करणारा संघ अधिक यशस्वी झाला आहे. येथे नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने दोनदा एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. त्याच वेळी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकदाच विजय मिळवला आहे, हा निसटता(अतितटीचा सामना) विजय होता. टीम इंडियाचा येथे रेकॉर्ड सरासरी राहिलं आहे. या तीन सामन्यांत भारतानं दोन विजयांची नोंद केली आहे, तर एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गोलंदाजांचे वर्चस्व, वेगवान गोलंदाजांना अधिक मदत…
या मैदानावर गोलंदाजांचे वर्चस्व जास्त राहिले आहे. येथे पहिल्या डावातील संघाची सर्वोच्च धावसंख्या 170 आहे. गेल्या वेळी या मैदानावर टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला केवळ 106 धावांवर रोखले होते. दुसऱ्या डावात येथे फलंदाजी करणे सोपे जाते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. याचा अंदाज आकडेवारीवरूनच लावता येईल, येथे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-3 गोलंदाजांमध्ये वेगवान गोलंदाज आघाडीवर आहेत.
#INDvAUS 1st T20 : थरार…! अखेरच्या चेंडूवर षटकार, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 2 विकेटने विजय
लाईव्ह मॅच कुठे पाहाल…?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना ‘स्पोर्ट्स-18’ आणि ‘कलर्स सिनेप्लेक्स’ टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल. यासोबतच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल.