उत्तराखंडयेथे मोठी दुर्घटना घडली आहे. लग्न लावून परत जाणारे वाहन दरीत कोसळून 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात उत्तराखंडमधील चंपावत येथे झाला आहे. चंपावतपासून 65 किमी अंतरावर असलेल्या या ठिकाणी एका कुटुंबात लग्न होते.
Uttarakhand | 14 people died after the vehicle they were travelling fell into a gorge near Sukhidhang Reetha Sahib road. The accident occurred early morning today when they were returning from a wedding ceremony: Kumaon DIG Nilesh Anand Bharne pic.twitter.com/aGidTX7AGX
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) February 22, 2022
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले आहे. टनकपूर-चंपावत महामार्गाला लागून असलेल्या सुखीधांग-दंडामिनार रस्त्यावर झालेल्या या वाहन अपघातात 16 पैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh each from PMNRF for the next of kin of those who lost their lives due to an accident in Uttarakhand. The injured would be given Rs. 50,000.
— PMO India (@PMOIndia) February 22, 2022
या अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “उत्तराखंडमधील चंपावत येथे झालेला अपघात हृदय हेलावणारा आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव करत आहेत.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांनी प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. ही रक्कम पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दिली जाणार आहे. याशिवाय जखमींना 50 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.
लक्ष्मण सिंग 61, मुलगा ध्यान सिंग, केदार सिंग 62, मुलगा दान सिंग, ईश्वर सिंग 40 ,मुलगा फतेह सिंग, उमेद सिंग 48 ,मुलगा गणेश सिंग, हयात सिंग 37, मुलगा दिवान सिंग, पुष्पा देवी 50, पत्नी शेर सिंग (सर्व काकनई गाव) पुनी देवी 55, पत्नी नारायण सिंग, भगवती देवी 45, पत्नी होशियार सिंग (दोघे हल्दवानी), बसंती देवी 35 (चंपावत), श्याम लाल 50, मुलगा दानी राम आणि विजय लाल 48, मुलगा ईश्वरी राम (दोघेही दांडा). असे अपघात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.