‘ई-वॉलेट’ वापरताय? (भाग-२)

‘ई-वॉलेट’ वापरताय? (भाग-१)

तक्रार अशी करा
मोबाइल वॉलेटच्या व्यवहारात गडबड आढळून आल्यास सेवा देणाऱ्या कंपनीला फोन करा आणि तक्रार नोंदवा.
तक्रार नोंदविल्यानंतर किमान महिनाभर वाट पाहा
सेवा कंपनीकडून समाधान न झाल्यास ओम्बूडसमनकडे जाण्याचा पर्याय निवडा.
ओम्बूसमनकडे एका वर्षाच्या आत तक्रार नोंदविणे गरजेचे आहे.

ही माहिती आवश्‍यक
मोबाइल वॉलेटमध्ये झालेल्या घोळाची तक्रार ओम्बूडसमनकडे करण्याअगोदर आपण अन्य ठिकाणी कोठे तक्रार तर केली नाही ना याची खातरजमा करून घ्यावी. जर आपण अन्य ठिकाणी तक्रार दाखल केली असेल तर ओम्बूडसमन आपल्या तक्रारीची दखल घेणार नाही आणि सुनावणी करणार नाही. तसेच जर तक्रारीत ठोस पुरावा आढळून आला नाही तर आपली याचिका फेटाळली जाईल.

खबरदारी घ्या
जर आपण मोबाइल वॉलेटच्या माध्यमातून व्यवहार करत असताना अॅप डाऊनलोड करताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. अज्ञात स्त्रोतांचे जसे की थर्ड पार्टी स्टोर, वेबसाइट पॉपअप किंवा संदेश किंवा ई-मेलच्या माध्यमातून आलेली लिंक, अॅप्लिकेशन डाऊनलोड करू नका. या ऍप्समध्ये मालवेअर असू शकतो. यातून हॅकर बनावट व्यवहार करू शकतात.

परवानगी तपासून पाहा
कोणत्याही प्रकारचा अॅप इन्स्टॉल करण्यापूर्वी त्याने मागितलेली परवानगी तपासून पाहा. गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड केलेला ऍप सुरक्षित असतो, असे अनेकांना वाटते. मात्र हे सत्य नाही.

ऍप लॉकरचा वापर
मोबाइलमध्ये अॅप लॉकरचा वापर करा. आपल्या डेटाला मालवेअरपासून सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतो. अॅप लॉकरला अधिकृत अॅप स्टोरने सहजपणे डाऊनलोड करता येते.

संदेश वाचण्याची परवानगी नको
आपल्या मोबाइलवर अशा कोणत्याच प्रकारच्या अॅपला डाऊनलोड करू नका जो की संदेश वाचण्याची परवानगी मागेल. अशा रितीने अॅपमधून आपल्या ओटीपी क्रमांक देखील चोरला जाऊ शकतो. यातून आपल्या अॅपने व्यवहारात घोळ निर्माण होऊ शकतात.

– सूर्यकांत पाठक, अ.भा. ग्राहक पंचायत

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here