वडगावशेरी येथील प्रकार : महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष
वडगावशेरी – पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडे हा उपयुक्त घटक असताना जाहिरातबाजांना मात्र त्याचा विसर पडला आहे. प्रभाग क्रमांक 3, 4, 5 मध्ये विविध झाडांवर खिळे ठोकण्याच्या वेदनादायी घटना या भागात घडत आहेत. या भागातील चौक, उद्याने, शाळा अनेक मोकळ्या ठिकाणी झाडांवर क्रूरतेने खिळे ठोकून जाहिरात फलके लावली जातात. विशेष म्हणजे पालिका प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताना दिसत आहे. तसेच पर्यावरणप्रेमी म्हणून मिरवणारेही याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. आशा झाडांचे रक्षण कसे करायचे हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणी झाडांवर खिळे टोकून शहर विद्रूप करताच आहेत; पण झाडांचे आयुष्यही कमी करत आहेत. मात्र, मनपाच्या वृक्ष संवर्धन समिती, उद्यान विभागाकडून आणि आकाशचिन्ह विभागाकडून बघ्याची भूमिका घेत आहे. मोक्याच्या ठिकाणी लावण्यात जाणाऱ्या बेकायदा जाहिराती आणि होल्डींगमुळे शहर विद्रूपीकरण होत आहे, आशाप्रकारे शहरविद्रोपी करणाऱ्यांच्याविरोधात पालिकेकडून गुन्हा दाखल त्यांना चाप लावण्याची कारवाई होऊ शकते. त्यामुळे शहर विद्रूपीकरण होणे बंद होईल. तसेच झाडांना इच्छा पोहोचवणाऱ्यांवर खरोखर कारवाई करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
झाडांवर खिळे ठोकणे हे वृक्ष विद्रूपीकरण कायद्यांतर्गत येते. त्यानुसार संबंधित खिळे कठोर कारवाईची आणि दंडाची तरतूद आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांवर संरक्षण व जतन अधिनियम 1975 कलम (21) अन्वये अशाविरोधात कारवाई होऊ शकते. त्याचप्रमाणे झाडावर आधार घेऊन विद्युत रोषणाई, फोकस लावणे असे प्रकारही करण्यात येतात. त्यावरही पालिका कारवाई करू शकते.
वाजेद खान (बिडकर), वकील
झाडांवर होणाऱ्या जाहिरातीमुळे शहर विद्रूपीकरण होते. त्यामुळे संबंधितांवर योग्य ती कारवाई वृक्ष अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे. वृक्ष अधिकाऱ्यांकडून कारवाई न झाल्यास पुढील काही दिवसांत नगररोडवरील जाहिरात केलेल्या झाडांना घेरा घालून आंदोलन करण्यात येईल.
राहुल शिरसाठ, उपाध्यक्ष युवक, कॉंग्रेस पुणे शहर