वॉशिंग्टन : करोनाचा कहर सुरूच असून येथील बळींची संख्या 16 हजारांहून अधिक झाली आहे. तसेच करोनाबाधित रुग्णांची संख्या 4 लाख 60 हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेतील मृतांमध्ये सर्वाधिक संख्या ही न्यूयॉर्कमधील असून येथील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. येथे करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परिस्थिती बिघडत चालली असल्याचे दिसून येत आहे.
न्यूयॉर्कमध्ये एका दिवसांत तब्बल 800पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत येथे मृतदेहांची रांग लागली आहे. या मृतदेहांना एकत्रित दफन केले जात आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हार्ट ट्विपन येथे अशा लोकांना दफन केले जात आहे. यासाठी मोठ मोठे खड्डे खोदले जात आहेत. आधी येथे आठवड्यात फक्त एकदाच मृतदेहांना दफन करण्यासाठी खड्डे खोदले जात होते. आता मात्र आठवड्यातील पाच दिवस अशा स्वरुपाचे खड्डे खोदण्याचे काम सुरू आहे. हे प्रमाण इतकं वाढल आहे की आता या कामासाठी बाहेरुन कॉन्ट्रॅक्टर बोलवले जात आहे.
करोना विषाणूमुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणात न्यूयॉर्कमध्ये इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत येथे 7 हजारांहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. तर शुक्रवारी करोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्या 10000ने वाढली आहे. हा आकडा 1 लाख 60 हजारांपर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 16500 लोकांचा मृत्यू झाला असून येथे 4 लाख 62 करोना पॉझिटिव्ह आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एलर्जी आणि इन्फेक्शियस डिजीज निर्देशक डॉक्टर एंथनी फौसी यांनी सांगितले की, अमेरिका सरकारने केलेल्या योजनांचा उपयोग होत असून मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. फौसी या व्हाइट हाऊसमधील करोना व्हायरस टार्स फोर्सचे प्रमुख्य सदस्य आहेत. आम्ही केलेल्या योजनांचा परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.