नोएडा : तबलगी जमातच्या किमान 10 सदस्यांना नियमबाह्य आश्रय दिल्याबद्दल पोलिसांनी शिुक्रवारी 13 जणांवर गुन्हा नोंदवला. हे सर्व जण बेगमपूर गावाचे रहिवासी आहेत. या नागरीकांनी त्यांना केवळ निवारा दिला असे नव्हे तर त्यांना अन्य ठिकाणी फिरण्यासही मदत केली आहे, असे पोलिसांनी सांगितल्या.
तत्पुर्वी गुरूवारी नोएडा आणि ग्रेटर नोएडा येथे लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या 149 लोकांना अटक करण्यात आली. त्यामुळे हे निर्बंध तोडल्याबद्दल गजाआड झालेल्यांची संख्या दोन हजार 316 वर पोहोचली आहे. ता काळात 650 एफआयआर नोंदवल्या आहेत. तर सहा हजार 79 लोकांकडून दंड ठोठावला आहे.
गौतमबुध्द नगर भागात 543 वाहने जप्त करण्यात आली आहेत. भा.द. सं.च्या कलम 188 आणि जमावबंदीचे कलम मोडल्याच्या आरोपावरून हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सुमारे 12 वस्त्या पुर्णत: सील करण्यात आल्या आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.