विॉंशंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुचनेनुसार येत्या काही आठवड्यात अमेरिका मध्यपुर्वेतील आपले लष्कर माघारी घेणार आहे. तथापि त्यानंतर इराणकडून त्या भागात हल्ल्यांचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानातून आपले सैन्य माघारी घेतल्यास त्याचा मोठा गैरफायदा इराणकडून घेतला जाईल अशी मोठी शक्यता आहे असे अमेरिकेच्या एका वरीष्ठ लष्करी अधिकाऱ्याने नमूद केले. अरबी आखातीतील निमीत्झ ही अमेरिकन युद्ध नौकाहीं काढून घेतली जाणार आहे. त्यामुळे मध्यपुर्वेतील सारा भाग अमेरिकन नियंत्रणापासून पुर्ण मोकळा होणार आहे.
दक्षतेचा उपाय म्हणून अमेरिकेने अरबी आखातीतील युद्ध नौका मागे घेऊ नये असे अमेरिकेतील अनेक संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे. तेथे लष्कर काढून घेतल्यानंतर काही विपरीत परिस्थिती उद्भवलीच तर त्याचा समर्थपणे सामना करण्यासाठी अमेरिकेने तेथे लढाऊ जेट विमानांची एक स्वतंत्र तुकडी तेथे तैनात केली पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.
मात्र असे असतानाहीं अमेरिकेची अरबी आखातातील निमीत्झ ही युद्धनौका मायदेशी येण्यास निघाली असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात एक वर्षापुर्वी इराणचे एक वरीष्ठ लष्करी अधिकारी कासीम सोलेमनी हे ठार झाले आहेत. त्यांच्या मृत्युच्या वर्षपुर्तीच्या दिनीच इराणने इराकवर हल्ल्याची योजना आखली आहे अशीही माहिती मिळत आहे. त्यामुळे अमेरिकन संरक्षण तज्ज्ञांची चिंता वाढली आहे.