Bharat Bandh । राज्यातील महत्वाच्या बाजार समित्या बंद

मुंबई – शेतकरी संघटनांनी जाहीर केलेल्या भारत बंद ( Bharat Bandh today ) दरम्यान राज्यातील बहुतांश बाजार समिती बंद होत्या. पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद सारख्या महत्त्वाच्या शहरातील घाऊक बाजारपेठाही बंद होत्या. राज्यातील ( Bharat Bandh today in maharashtra ) बहुतांश शहरात दुकाने बंद ठेऊन व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला.

मुंबईला ( Bharat Bandh today in mumbai ) भाजीपुरवठा करणाऱ्या नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. व्यापारी आणि घाऊक विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. भाजीपाल्याची वाहतूक करणारे शेकडो ट्रक या बाजार समितीत दाखल झाले. मात्र व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने कोणतेही लिलाव झाले नाहीत.

ठाणे आणि पालघर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने बंदला ( Bharat Bandh today ) पाठिंबा दर्शवला होता. मात्र राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद न पाडण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते.

मुंबईतील लोकल्स आणि बस व्यवस्थेवर कोणताही परिणाम झाला नाही. रिक्षा आणि टॅक्‍सी संघटनांनी बंदला पाठींबा जाहीर केला. मात्र त्यांच्या सेवा नेहमीप्रमाणे सुरू होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.