वॉशिंग्टन –एप्रिल ते जून या तिमाहीत अमेरिकेचा विकासदर उणे 32.9 टक्के मोजला गेला आहे. त्यामुळे जागतिक शेअरबाजाराचे धाबे दणाणले आहेत.
अमेरिकेतील व्याजदर शून्य टक्क्यांच्या जवळपास आहेत.त्याचबरोबर अमेरिकन सरकारने फेडरल रिझर्व्हच्या माध्यमातून मोठी मदत अमेरिकेच्या उद्योगांना आणि नागरिकांना करूनही अमेरिकेचा विकासदर कोसळला आहे. दरम्यान, जर्मनीचा विकासदरही या काळात उणे 11.5 टक्के इतका नोंदला गेला असल्याचे वृत्त आहे. विकसित देशांची करोनामुळे मोठी हानी झाल्यामुळे जागतिक मंदी वाढण्याची शक्यता आहे.