जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. तर कोरोनाचा फैलाव चीनमध्ये पसरण्यापूर्वी एका प्रयोगशाळेतून तीन संशोधक आजारी पडल्याच्या बातमी समोर आली होती.
दरम्यान, जगभरासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसह त्याचा स्त्रोत शोधण्यासाठी सखोल चौकशी करण्याची मागणी सुरू झाली आहे. Corona च्या उत्पत्तीची तपासणी पुन्हा होणं आवश्यक असून अमेरिकेने असे सांगितले की, हा विषाणू नेमका कुठून आला, याची पुन्हा चौकशी केली पाहिजे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO च्या मंत्रीपदाच्या बैठकीत अमेरिकेचे शिक्षणमंत्री जेव्हियर बेसेरा यांनी ही मागणी केली. त्यांनी एका व्हिडिओ मॅसेजद्वारे असे सांगितले की, कोरोनाचा स्रोत आणि त्याची उत्पत्ती पुन्हा शोधण्यासाठी पारदर्शक व वैज्ञानिक आधारे नवीन अभ्यास करण्यात आला पाहिजे.
यावेळी जेव्हियर यांनी चीनचे नावे न घेता ही मागणी केली आहे. रविवारी वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने अमेरिकन गुप्तचर अहवालात असे स्पष्ट केले की, वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे तीन संशोधक नोव्हेंबर २०१९ मध्ये आजारी पडले होते. एका महिन्यानंतर चीनमध्ये कोरोनाच्या पहिल्या रूग्णाची नोंद करण्यात आली. याच लॅबमधून कोरोनाचा फैलाव जगभऱ झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
गेल्या वर्षी ट्रम्प प्रशासनानेही दावा केला होता की, कोरोना चिनी लॅबमधून बाहेर पडला होता. अमेरिकेसह अनेक देशांकडून मागणीनुसार कोरोनाचे स्रोत शोधण्यासाठी तसेच कोरोनाच्या उत्पत्तीची पुन्हा तपासणी व्हावी, यासाठी डब्ल्यूएचओ टीम गेल्या वर्षी जानेवारीमध्ये चीनमध्ये गेली होती. या पथकाने वुहान लॅबलाही भेट दिली होती. डब्ल्यूएचओने कोरोना लॅबमधून लीक झाल्याचे नाकारले होते.