करोना लॉकडाऊनच्या काळात सगळे उद्योगधंदे ठप्प पडले असताना एकाच क्षेत्रात अगदी तेजी होती. या क्षेत्रातील कारागिर आणि तंत्रज्ञांनी लॉकडाऊनच्या काळात भरभरून कमाई केली.
ऑफिसऐवजी घरात बसून दिवस रात्र मेहनत करून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना चार वर्षांपूर्वीच्या स्टेटसच्या दुप्पट स्टेटस मिळवून दिले आहे. हे क्षेत्र म्हणजे ऍनिमेशन. ऍनिमेशनपटांची चलती एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुरूच होती.
2019 पासून सिनेमांच्या ऍनिमेशनपट बनवण्याच्या उद्योगाला अगदी गती मिळाली. छोटा भीम, मोटू पतलू, यासारखे शेकडो रोल अगदी घराघरात पोहोचले आहेत. देशात 2016 मध्येच ऍनिमेशन इंडस्ट्रीची उलाढाल 53 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचली होती. आता बॉलिवूडमधील गाजलेल्या सिनेमांचे ऍनिमेशन तयार केले जाते आहे.
छोटा सिंघम, बाहुबली, सिंबा यासारख्या सिनेमांच्या ऍनिमेशनपटांनी बाल प्रेक्षकांना वेड लावले आहे. हे ऍनिमेटेड हिरो पाहिजे ते स्टंट सहज करू शकतात. त्यांच्यासाटी शुटिंगच्या तारखांचा घोळ नाही. लोकेशन बघायला नको, लॉकडाऊनची चिंता नाही आणि कसलीच झंझट नाही. आता “दबंग’ची ऍनिमेटेड सिरीज डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार असल्याचे जाहीर झाले आहे आणि याच्या रिलीज डेटची घोषणा लवकरच होणार आहे.