अमेरिका इराणमध्ये सायबर वॉरला सुरूवात

वॉशिंग्टन – अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असून आता अमेरिकेने इराणवर सायबर हल्ले सुरू केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर नवीन निर्बंध लादू शकतात, अशी माहिती देखील समोर आली आहे. अमेरिका इराणच्या क्षेपणास्त्र नियंत्रण यंत्रणा आणि गुप्तहेरांच्या नेटवर्कवर बारीक नजर ठेवून असून यावर अमेरिकेकडून सायबर हल्ले सुरू आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभुमीवर ट्रम्प यांनी ट्विट केले आहे की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत इराणला आण्विक अस्त्रे विकसित करू देणार नाही. इराणजवळ आण्विक अस्त्रे असू शकत नाहीत. मात्र, ओबामा यांच्या खतरनाक योजनेमुळे इराण खूप कमी वर्षांत आण्विक मार्गावर आला आहे. आम्ही इराणवर आणखी निर्बंध लागू करणार आहोत. ज्या दिवशी इराणवरील निर्बंध हटतील आणि इराण पुन्हा एक समृद्ध राष्ट्र बनेल, त्या दिवसाची आम्हाला प्रतीक्षा आहे. तसेच जोपर्यंत या समस्येचे समाधान शोधले जात नाही तोपर्यंत या पर्यायावर विचार सुरूच राहील, असे ही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, आमच्या विरोधात कुठल्याही प्रकराचा हल्ला करणे अमेरिकेला महागात पडेल, असा इशारा इराणच्या सैन्याने दिला आहे. ओमानच्या खाडीत 13 जून रोजी दोन तेल टॅंकरवर हल्ला करून ते उडवून देण्यात आले होते. अमेरिकेने याबाबत इराणवर थेट आरोप केले होते. त्यानंतर ट्रम्प यांच्या आदेशानुसार सलग एक आठवडाभर इराणवर सायबर हल्ले केले गेले. मात्र, अमेरिकेच्या सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी अमेरिकेने सायबर हल्ला केलेला नाही, असे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.