संयुक्त राष्ट्र – संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची विशेष बैठक येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात आयोजित करण्यात येणार आहे. सुरक्षा परिषदेचे सदस्य असलेल्या 15 देशांचे प्रतिनिधी या विशेष बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक दहशतवादाला विरोधाच्या मुद्दयावरून आयोजित करण्यात येणार आहे.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेवर भारताला दोन वर्षांसाठी अस्थायी सदस्यत्व मिळाले आहे. त्या सदस्यत्वाचे सध्या दुसरे वर्ष सुरू आहे. भारताच्या सदस्यत्वाची मुदत येत्या डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यावेळी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद देखील भारताला एक महिन्यासाठी मिळणार आहे.
येत्या ऑक्टोबर महिन्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सुरक्षा परिषदेच्या विशेष बैठकीला अल्बेनिया, ब्राझील, गॅबॉन, घाना, आयर्लंड, केनिया, मेक्सिको, नॉर्वे आणि यूएई या अस्थायी देशांसह चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका हे कायम सदस्य देशांचे प्रतिनिधी देखील उपस्थित असणार आहेत.
नकाराची भीती दूर करण्यासाठी ‘रिजेक्शन थेरपी’
दहशतवादाविरोधात तंत्रज्ञानातला वाढता विकास, दहशतवादी कृत्यांसाठी इंटरनेट आणि सायबर मीडियाचा वाढता वापर, दहशतवादी कृत्यांसाठी केले जाणारे अर्थकारण आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वाढता वापर हे या विषेष बैठकीचे मुख्य विषय असणार आहेत.
पुतीन यांची गर्लफ्रेंड अमेरिकेच्या काळ्या यादीत