उर्वशी रौतेलाला बॉलीवूडमधील सर्वांत लहान वयाची ऍक्ट्रेस आहे. तिला सोशल मीडियावर खूप फॉलोअर्सदेखील मिळाले आहेत. तिच्यासाठी एक खूशखबर आहे. उर्वशीला अलीकडेच 2020 मध्ये रिलीज झालेल्या
“व्हर्जिन भानुप्रिया’मधील रोलसाठी बेस्ट ऍक्ट्रेस क्रिटिक चॉइस ऍवार्ड मिळाला आहे. ही बातमी स्वतः उर्वशीने इन्स्टाग्रामवरच्या पोस्टमध्ये शेअर केली आहे. या रोलला चांगली पसंती दिल्याबद्दल तिने प्रेक्षक आणि समीक्षकांचे आभारही मानले आहेत.
“व्हर्जिन भानुप्रिया’मध्ये उर्वशीने भानुप्रिया अवस्थीचा रोल केला होता. इंटरनॅशनल आयकॉनिक ऍवार्ड 2021 च्या निवड समितीलाही तिने धन्यवाद दिले आहेत. आता ती एका सायन्स फिक्शनमधून तमिळ फिल्ममध्ये पदार्पण करणार आहे. त्यामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटी एक्सपर्टचा रोल करणार आहे.
त्यानंतर ती एका ड्युएल लॅंग्वेज थ्रिलरमध्येही दिसणार आहे. सध्या ती “इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये रणदीप हुडाबरोबर काम करते आहे. ही वेबसीरिज अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्रा यांच्या जीवनावरील सत्यघटनेवर आधारलेली आहे.