Bollywood – बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. उर्वशी आपल्या लाईफचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता नुकतीच उर्वशी भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गेली होती.
यावेळी उर्वशी रौतेलाचा २४ कॅरेट सोन्याचा आयफोन हरवला. उर्वशीने स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना ही माहिती दिली. हे ऐकून अभिनेत्रीचे चाहते चांगलेच नाराज झाले. आता तिने एक नवीन घोषणा केली आहे. ज्यांना तिचा फोन सापडेल त्यांना भेटवस्तू देण्याचे आश्वासन उर्वशीने केले आहे.
तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करताना अभिनेत्री उर्वशीने म्हटले आहे की, ‘तिच्या फोनचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले आहे. अहमदाबादमधील एका मॉलमध्ये फोनचे लोकेशन ट्रैक करण्यात आले आहे. आता या उर्वशीने तिचा फोन शोधणाऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. मात्र, या बक्षीसात कशाचा समावेश असेल हे अद्याप समोर आलेले नाही.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना तिने लिहिले होते की, “नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये माझा 24 कॅरेट अस्सल सोन्याचा आयफोन गायब झाला. जर कोणाला तो सापडले तर कृपया मला तो परत करा माझी मदत करा… शक्य तितक्या लवकर माझ्याशी संपर्क साधा. मला जे मदत करू शकतात त्यांना टॅग करा. यासोबतच तिच्या पोस्टमध्ये मोदी स्टेडियम आणि अहमदाबाद पोलिसांनाही टॅग केले होते. मात्र, यानंतर अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरे जावे लागले.’
दरम्यान, उर्वशीकडे 24 कॅरेट सोन्याचा iPhone 14 Pro Max होता. हा फोन खूप मौल्यवान होता कारण तो विशेष ऑर्डरनुसार डिझाइन केलेला होता. उर्वशीच्या फोनची किंमत जवळपास 7,55,430 रुपये आहे.
उर्वशीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, उर्वशीला अलीकडेच ‘बिग बॉस ओटीटी 2’ विजेता एल्विश यादवसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. लवकरच ही अभिनेत्री काही मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याशिवाय उर्वशी शेवटची वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये दिसली होती.