नागरी बॅंकात भ्रष्टाचाराच्या पाच वर्षात हजार तक्रारी

मुंबई : गेल्या पाच आर्थिक वर्षात नागरी सहकारी बॅंकात घोटाळ्याच्या सुमारे हजार तक्रारी आल्या. त्यात कोटीपेक्षा अधिक घोटाळा झाला असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. तर 2018 -19 या आर्थिक वर्षात 181 घोटाळ्यांची तपासणी करण्यात आली.

गेल्यावर्षी तपासणी केलेल्या 181 पैकी 2017-18 मधील 99 तर 2016-17मधील 27 होत्या असे माहितीच्या अधिकारात मागावलेल्या उत्तरात या मध्यवर्ती बॅंकेने सांगितले आहे. 2015-16मध्ये 187 तर 2011415मध्ये 478 केसेस नोंदवण्यात आल्याचे बॅंकेने स्पष्ट केले.

रिझर्व्ह बॅंकेकडे भ्रष्टाचाराची तक्रार बॅंकेने दाखल करावी लागते. तसेच त्यात भ्रष्टाचार झाला असेल तर त्याबाबत संबंधीत तपास यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी लागते. बॅंकेने कर्मचाऱ्यांचे उत्तरदायित्व आणि दोषींना शिक्षा याची जबाबदारी घ्यायची असते, असे बॅंकेने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.