मेलबर्न : भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस याने आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत विजयी सुरूवात केली आहे. मेलबर्न येथे सुरू असलेल्या आॅस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत लिएंडर पेसनं लॅटव्हियाची येलेना ओस्टापेन्कोच्या साथीत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
#TOPSAthlete @rohanbopanna and his partner Nadiaa Kichenok advance to the @AustralianOpen quarterfinals in mixed doubles. @Leander in his final @AustralianOpen also reached the 2nd round with @JelenaOstapenk8 @KirenRijiju @DGSAI @RijijuOffice @PIB_India @PMOIndia @AkashvaniAIR pic.twitter.com/5kXeu7fdfg
— SAI Media (@Media_SAI) January 26, 2020
लिएंडर पेस आणि त्याची साथीदार लॅटव्हियाची येलेना ओस्टापेन्को या जोडीनं रविवारी पहिल्या फेरीच्या सामन्यात मार्क पोलमन्स आणि स्टॉर्म सॅन्डर्स या ऑस्ट्रेलियन जोडीचा ६-७, ६-३, १०-६ असा पराभव केला.
ही लढत १ तास २७ मिनिटे चालली. आॅस्ट्रेलियाच्या पोलमन्स आणि सॅन्डर्स या या जोडीला वाइल्डकार्ड व्दारे स्पर्धेत प्रवेश मिळाला होता.