Mango Man Story : राजधानी लखनऊचे आंबे भारतात प्रसिद्ध आहेत. आता पुन्हा एकदा लखनऊच्या आंब्यांची चर्चा जगभरात होणार आहे. याच कारण ठरलेत येथील मँगो मॅन आणि त्यांनी केलेला नवा आविष्कार. लखनऊच्या एका व्यक्तीने चक्क आंब्याच्या आगळ्यावेगळ्या प्रजातीला जन्म दिला आहे. या आगळ्यावेगळ्या झाडाचे आंबे लवकरच सर्वांना चाखायला मिळणार आहेत.
या झाडाची चर्चा परदेशातील कृषी शास्त्रज्ञ करत आहेत. लखनौमधील ८४ वर्षांच्या हाजी कलीमुल्ला खान यांनी आंब्याचे कलम करून एका आगळ्यावेगळ्या आंबा प्रजातीला जन्म दिला आहे.यापूर्वी देखील असे अनेक प्रयोग केल्यामुळे हाजी हे जगभर ‘मँगो मॅन’ म्हणून ओळखले जातात आता त्यांनी पुन्हा एकदा चमत्कार घडवला आहे. त्यांनी २०२३ मध्ये आंब्याची नवीन जात लावली होती, ज्याचे आता झाड झाले आहे आणि त्याला खूप मोठी पाने आहेत. हे झाड नेहमीच्या आंब्याच्या पानांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. त्यांचा आकार बराच मोठा आहे. | Mango Man Story
जगातील आगळंवेगळं झाड
हाजी कलीम उल्लाह खान यांनी सांगितले की, हे आंब्याचे झाड कलम तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. २०२३ मध्ये आंब्यावर आणखी एक प्रयोग करण्याच्या कल्पनेने अनेक आंब्यांच्या बिया घेऊन पेरणी केली होती, असे त्यांनी सांगितले. आता आंब्याचे छोटे झाड आले आहे. हे पाहून खूप आनंद झाला. हा प्रयोग यशस्वी होईल, कारण त्यांनी आंब्यावर आतापर्यंत केलेले सर्व प्रयोग यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी लाखो आंब्याची झाडे यशस्वीपणे लावली आहेत. | Mango Man Story
हाजी सांगतात की या नवीन झाडाची पाने इतकी मोठी आहेत की त्यावर आंबा आल्यावर तो खूप मोठा असेल असे वाटते. या झाडाला आंबे येण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागतील, कारण त्याचा आकार आणखी मोठा होईल असे त्यांनी सांगितले. मग त्यावर मोहोर येईल आणि नंतर आंबे लागतील. | Mango Man Story
चवदार असतील झाडाचे आंबे
त्यांनी सांगितले की, त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो की एवढ्या मोठ्या पानांच्या झाडावर आंबा आला की तो उत्तम रसाचा असतो. रस असलेले आंबे लवकर पचतात आणि लोकांना अधिक शक्ती देतात, म्हणूनच त्याची पाने पाहून असे वाटते की ते जगातील एक आगळेवेगळे झाड बनणार आहे, कारण आजपर्यंत इतकी मोठी पाने असलेली आंब्याची झाडे कोणाच्याही पाहण्यात आलेली नाहीत. संपूर्ण जगात हे एक अनोखे आंब्याचे झाड असेल, ज्याला इतकी मोठी पाने असतील. | Mango Man Story
2008 मध्ये मिळाला पद्मश्री
या अद्भूत कार्यासाठी 2008 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. आश्चर्यकारक बाब म्हणजे मँगो मॅन या नावाने जगात प्रसिद्ध असलेल्या या व्यक्तीचे शिक्षण केवळ 7 वी पर्यंतच झाले आहे, मात्र आजही मोठे शास्त्रज्ञ,कृषी अधिकारीही त्यांच्याकडून सल्ला घेतात. | Mango Man Story