भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी
पुणे – बारामती लोकसभा मतदार संघ पिंजून काढण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दि.22 ते 24 सप्टेंबर असा तीन दिवसीय दौरा करणार आहेत. यात त्यांचे सर्वच विधानसभा मतदार संघात सुमारे 21 कार्यक्रम आहेत. हा दौरा यशस्वी करण्यासाठी भाजपच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दि. 22 सप्टेंबरला सकाळी 8.30 वाजता धनकवडी येथे विचार परिवार समन्वय बैठक, सकाळी 9.10 वा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. धायरीला सकाळी 10 वा. संघटनात्मक कार्यक्रम, जिल्हा पदाधिकारी व मंडल अध्यक्षांबरोबर बैठक होणार आहे. 11 वा. वारजे येथे लोकसभा कोअर समितीबरोबर बैठक आहे. 1.15 वा. बावधन येथे मोर्चा पदाधिकाऱ्यांशी संवाद. दुपारी 3.30 वा.भोर येथे लाभार्थींची संवाद.
दि. 23 सप्टेंबरला सकाळी 9.30 वा.जेजुरी येथ पदाधिकारी, लोकप्रतिनिधींबरोबर बैठक, 11.30 वा. मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व जन आरोग्य औषध दुकानाला भेट. दुपारी 12.45 वा. बारामती भाजप कार्यालयाला भेट, दुपारी 3 वा. सामाजिक कार्यकर्ते, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, व्यापारी, प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधतील.
तर, दि. 24 सप्टेंबरला सकाळी 9 वा. इंदापूर येथे युवक व मतदारांसोबत संवाद, दुपारी 1.50 वा. राहू येथे महिला मोर्चा प्रतिनिधींशी संवाद, पिंपळगावमध्ये दुपारी 2.40 वा.
आयटी व युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार आहे. त्यानंतर पुण्यातील कौन्सिल हॉल येथे सायं. 4.30 वा. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर आढावा बैठक होणार आहे, अशी माहिती भाजपच्या वतीने देण्यात आली आहे.