Odisha Train Accident – ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताबाबत संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी झालेल्या तीन ट्रेनच्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. या अपघतानंतर 100 हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नाही तर अद्याप अनेक मृतदेह सापडलेले नाही.
या अपघातत कोणी मुलगा तर कोणी बाप गमावला. याचे अनेक हृदयस्पर्शी व्हिडिओ समोर आले होते. या अपघातानंतर युद्धपातळीवर बचाव सुरू करण्यात आले होते. त्यादरम्यान एक डायरीचे पानं बचाव पथकांना सापडले आहे. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघातानंतर या डायरीची पाने सर्वत्र विखुरलेली होती. त्यातील एक पान रेल्वे रुळावर सापडले. ज्यात बंगाली भाषेत “अल्पो अल्पो मेघ थेके हल्का ब्रिस्टी होय, छोटो चोटो गोलपो ठेके भालोबासा सृष्टि होय, असे लिहिले आहे. याचा अर्थ “मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावर प्रेम करत राहीन, तू माझ्या हृदयाच्या जवळ आहेस.”, असा मजकूर या पानांवर लिहला होता. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
परंतु ही डायरी नेमकी कोणाची आहे हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. कदाचित या अपघातामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असू शकतो, अथवा ती व्यक्ती जखमी झालेली असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र रेल्वे रुळांवर सापडलेली ही कवितांची पानं जपून ठेवण्यात आली आहे.