चीनमध्ये पुन्हा एकदा ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रीमिंग दरम्यान दारू पिल्याने एका इंफ्ल्यूएंसरचा जीव गेल्याची घटना समोर आली आहे. २७ वर्षीय स्ट्रीमरची पत्नीने याबाबत चीनच्या स्थानिक वृत्तवहिनीला सम्पूर्ण घटनेची माहिती दिली. तिने सांगितले,’सकाळी अतिप्रमाणात दारू पिल्याने लाईव्ह स्ट्रीमरचा जीव गेला. ऑनलाइन जगतात झोंग युआन हुआंग जी किंवा ब्रदर हुआंग या नावाने यास ओळखले जात होते.’ दरम्यान याच घटनेबाबत न्यूयॉर्क पोस्टने लाइव-स्ट्रीमिंगच्या दरम्यान खूप प्रमाणात मद्यपान केल्याची ही दुसरी घटना आहे.’
हुआंग हा वायरल ड्रिंकिंग चैलेंजने मृत्यू झालेला दुसरा इन्फ्लुएंसर आहे. सोशल मीडियावर हुआंगची ओळख एक इंटरनेट सेलेब आहे. सोशल मीडियावर त्याचे 176,000 फॉलोअर्स आहे. न्यू यॉर्क पोस्ट सांगितले की,’प्रकारे हुआंगने मध्यपान केले त्याला “चीनी फायरवाटर” म्हटले जाते. वायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की हुआंग एक-एक करून दारूच्या बोटल कशाप्रकारे रिकाम्या करतोय.’
तत्पूर्वी, ३४ वर्षीय वांग नावाच्या सोशल मीडिया इंफ्लुएंसर ने लाइव येऊन 7 दारूच्या बोटल मधील दारू पिली होती. आणि काही तासात त्याच्या मृत्यू झाला होता. सध्या चीनमध्ये पीके चॅलेंज खूप सुरू आहे. या अंतर्गत लोक त्यांचे अनुयायी आणि अनोळखी लोकांसोबत स्पर्धेत सहभागी होतात. यामध्ये व्यक्तीला गाणे, नृत्य, पुश-अप अशा अनेक स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागतो. या गेममधील विजेत्या स्पर्धकाला प्रेक्षक बक्षिसे आणि भेटवस्तू देतात. तर पराभूतांना शिक्षा होते. या अंतर्गत वांगला दारू पिऊन शिक्षा झाली.