संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाच्या होणाऱ्या दोन महत्वाच्या बैठकाही करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. या मंडळाच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत सुदान मधील स्थितीवर चर्चा होणार होती. सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद आळीपाळीने विविध देशांकडे जात असते. त्यानुसार या बैठका आता चीनच्या अध्यक्षतेखाली होणार होत्या. पण चीनने या बैठका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला अन्य देशांनीही मान्यता दिली आहे.
संयुक्तराष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुज्जारीक यांनी सांगितले की, संयुक्तराष्ट्रांच्या कर्मचाऱ्यांपैकी काही जणांना याची लागण झाली आहे. तथापी संयुक्तराष्ट्रांचे व सरचिटणीसांचे कार्यालय आम्ही अद्याप उघडे ठेवले आहे. पण या संस्थेच्या न्युयॉर्क येथील कार्यालयात येणाऱ्यांची संख्या कमालीची घटली आहे.