भोपाळ :- मध्य प्रदेशातील ओरछा येथील श्री रामराजा सरकार मंदिराच्या मार्गावरील दारूच्या दुकानाला विरोध करत उमा भारती यांनी येथे वाइन शॉपसमोर गायींना खुंटीला बांधून “मधुशाला मे गोशाळा’ अभियान सुरू केले आहे. अत्यंत चुकीच्या ठिकाणी हे दुकान सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. काही काळापूर्वी त्यांनी या दारू दुकानात शेण टाकून निषेध नोंदवला होता. निवारी जिल्ह्यातील ओरछा येथील प्रसिद्ध रामराजा मंदिराबाहेर हे दुकान आहे.
तत्पूर्वी, उमा भारती यांनी ट्विट करून घोषणा केली होती की, ओर्छाच्या मुखाशी असलेल्या रामराजा सरकारच्या प्रवेशद्वारासमोरील दारूचे दुकान बेकायदेशीर आहे. कायदा विभागाच्या चुकीमुळे त्यांना न्यायालयाकडून स्थगिती मिळाली आहे. म्हणूनच मला ही मधुशाला गोशाळेत रुपांतरीत करायची आहे.
उमा भारती म्हणाल्या, येथे मंदिरासमोर सुरू असलेल्या दारूच्या दुकानात सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. हे दुकान अडीच किलोमीटर अंतरावर देण्यात आले होते, मात्र अधिक महसूल मिळावा म्हणून येथे जागा देण्यात आली. माझ्या मुद्याची दखल घेत सरकारने नोटीस दिली होती, मात्र दारू विक्रेत्यांनी न्यायालयाकडून स्थगिती मिळवली आहे.
Budget 2023 : बिहारच्या मागण्यांकडे यावेळीही कानाडोळा – नितीश कुमार
उमा भारती म्हणाल्या, ‘मी शिवराज सरकारला पाच सूचना दिल्या आहेत की दारूची दुकाने शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, कामगार वस्ती, न्यायालय आणि रुग्णालयांपासून दूर असावीत. यामध्ये महसूलाचे कोणतेही नुकसान होणार नाही. हे एकच दुकान नाही, संपूर्ण मध्य प्रदेशात 18 हजार दुकाने आहेत, ज्यामुळे मध्य प्रदेशचे भवितव्य धोक्यात आले आहे. अनेकांचे जीवन उद्वस्त होत आहे. ही दुकाने मध्य प्रदेशला दारूत बुडवतील.