मुंबई – मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सभेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दसरा मेळावा आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असा एल्गार करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारला कडक इशारा दिला.
ते पुढे म्हणाले की, आज हे एवढं आहे, दसऱ्याला किती असेल? किती पटीत असेल, यंदाचा दसरा आपल्या पंरपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार.
उध्दव ठाकरेंचे यांच्या सभेतील महत्वाचे मुदद्दे…
1. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एल्गार; शिंदे सरकारला कडक इशारा, संजय राऊत मोडेन, पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय!
2. मुलं पळवणारी टोळी पाहिली पण बाप पळवणारी औलाद राज्यात – उद्धव ठाकरे
3. भाजपला आस्मान दाखवणारच, कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिला होता – उद्धव ठाकरे
4. मुंबईवर सध्या गिधाडं फिरत आहेत, अमित शाह हे त्यापैकीच एक – उद्धव ठाकरे
5. आईवर चाल करून येणार्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही -उद्धव ठाकरे
6. शिवसेना म्हणजे मुंबईकरांचा विश्वास – उद्धव ठाकरे
7. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ, अशी मिंधे गटाची अवस्था – उद्धव ठाकरे
8. ‘फोटोग्राफी माझा विषय असूनही, आम्ही पेंग्विन आणल्यावर नाटकं केली नाहीत’ – उद्धव ठाकरे
9. मुंबईवर आपत्ती येते, तेव्हा शिवसेना धावून येते , तेव्हा भाजपवाले कुठे असतात? – उद्धव ठाकरे
10. 26 जुलै 2005 च्या पुरातही शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते – उद्धव ठाकरे
11. चित्ते डरकाळी फोडत नाहीत, म्याव करतात – उद्धव ठाकरे
12. निवडणुका आल्यावर भाजपाला मुंबई आठवते , भाजपासाठी मुंबई म्हणजे केवळ जमीन,मुंबई पिळायची, मुंबई गुलाम करायची हा प्रयत्न सुरु आहे ,पुन्हा एकदा सांगतो शिवसेनेची भाजपासोबतची 25 वर्षाची युती सडली – उद्धव ठाकरे
13. व्हर्च्युअल क्लासरुम ही संकल्पना 15 वर्षापूर्वी पहिली मुंबईत शिवसेनेनी आणली – उद्धव ठाकरे
14. आरोग्यविषयक पायाभूत सुविधा फक्त मुंबईत, मुंबईत 15 दिवसाता कोव्हिड सेंटर उभे केले – उद्धव ठाकरे
15. भाजपानं माणसं धुवायची लॉन्ड्री काढली का? ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप त्यांना भाजपाने पक्षात घेतलं ,भ्रष्टाचाराबाबत कोणत्या तोंडाने बोलतात? आधी खोक्यातून बाहेर या, पंतप्रधानांना राखी बांधायला हीच बहीण मिळाली? भावना गवळींनी राखी बांधल्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा- उद्धव ठाकरे
16. भाजपने मुन्नाभाईसोबत घेतला आहे, पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मुंबईत येत आहेत. मुंबई जिंकण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, तपास यंत्रणा, केंद्रीय गृहमंत्री आहेतच, सोबत मुन्नाभाईही आहे. सगळेच तुटून पडले आहेत – उद्धव ठाकरे
17. अमित शहा यांना आव्हान देतोय, तुमचे चेले चपाटे येथे बसलेले असतील, तर त्यांना सांगा, महिन्याभरात मुंबई महापालिका तेव्हाच विधानसभा निवडणूक घ्या, हिंमत असेल तर जिंकून दाखवा, कुस्ती आम्हालाही येते-बघू कुणाच्या पाठीला माती लागते, हिमंत असेल तर या समोर…देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातली ही सर्वात शेवटची निवडणूक – उद्धव ठाकरे
18. आज हिंदू-मुस्लीम भेदभाव करुन पाहा, मुस्लिम लोक देखील शिवसेनेसोबत आहेत. तुम्ही हिंदूंमध्ये मराठी-अमराठी असा भेदभाव करुन बघा. आज अमराठी जनतादेखील आमच्यासोबत आहे. गुजराती, उत्तर प्रदेशचे सगळे आहेत. कारण कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी सर्वांचे प्राण वाचवले आहेत. – उद्धव ठाकरे
19. तुमची जी शाहानीती आहे यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तोडा फोडो राज्य करा ही निती महाराष्ट्रात शक्य नाही.- उद्धव ठाकरे
20. ही निवडणूक आयुष्यातली पहिली निवडणूक समजून लढा’,कामाला लागा, ‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’ – उद्धव ठाकरे