Uddhav Thackeray । शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जर मोदींच्या पाठीवर हात टाकला नसता तर आज मोदी हे आडवाणी, वाजपेयी यांच्यामध्ये दिसले नसते. त्याच बाळासाहेब ठाकरेंची हिंदुत्ववादी शिवसेना असलेली घराणेशाही तुम्हाला नको वाटतेय का?
संघ मुक्त भारत करा म्हणणारा नितिशकुमार तुम्हाला चालतो. काॅंग्रेसच्या संस्कृतीत वाढलेली माणसं चालतात आणि हिंदूत्ववादी असलेल्या आमच्या घराणेशाहीबद्दल बोलताय. होय, मी ठाकरे घराणेशाहीतला आहे, असे म्हणत माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. । Uddhav Thackeray
कोपरगाव येथे बुधवारी ठाकरे गटाच्या वतीने जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, देशाचे पंतप्रधान जातील तिथे घराणेशाहीबद्दल बोलत असतात. पण, स्वत:च्या कुटूंबाचा पत्ता नाही आणि दुसऱ्यांची घराणेशाही काढता.
अशोक चव्हाण हे शंकरराव चव्हाण यांचे पुञ आहेत ही घराणेशाही नाही काय. शिवसेनेशी गद्दारी केलेले मुख्यमंत्री व त्यांचा मुलगा तसेच कॉंग्रेस व शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्यांची घराणेशाही चालते. अगदी अजित पवार हे सुध्दा घराणेशाहीचे प्रोडक्ट आहे, ते चालतात, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. । Uddhav Thackeray
प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र आहे. संपूर्ण महाराष्ट्र आमच्या कुटूंबावर प्रेम करतो. उध्दव ठाकरे एकटा कोणी नाही. पण उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना किंमत आहे. देशातील शेतकऱ्यांची घरेच्या घरे उद्ध्वस्त करणाऱ्यांनी घराणेशाहीवर बोलू नये, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.