पुणे – महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेचे आमदार उदय सावंत हेही गुवाहाटीला रवाना झाले आहेत. ते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाले तर महाराष्ट्र सरकारचे 8 वे मंत्री शिंदे गटात सामील होतील. उदय सावंत हे कोकणातील शिवसेनेचे प्रमुख नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आहेत.
Correction | Uday Samant*, Maharashtra Minister of Higher & Technical Education joins Eknath Shinde faction at Guwahati. He is the 8th minister to join the Shinde camp: Sources pic.twitter.com/cFFt43yEFk
— ANI (@ANI) June 26, 2022
चार्टड विमानाच्या लिस्टमध्ये उदय सामंत यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच त्यांचा फोन नॉट रिचेबल येत आहे. त्यांच्या काही समर्थकांमध्ये मात्र उदय सामंत गुवाहटीला पोहोचल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, उदय सामंत अधिकृत शिंदे गटात सामील झाल्याचे अद्याप कुठेही वृत्त आलेले नाही.
दरम्यान, आसाममधील गुवाहाटीमध्ये शिंदे गटाची बैठक सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीत बंडखोर आमदारांसोबत पुढील रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यानंतर आणखी एक महत्त्वाची बैठक होऊ शकते.