UBT Candidate List । महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनेआज अखेर आपली १७ जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केलीय. ठाकरे गटाचे नेते आणि संजय राऊत यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. राज्यभरातील 17 उमेदवारांची यादी शिवसेना ठाकरे गटानं जाहीर केली आहे. मात्र आता जाहीर झालेल्या यादीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय.
ठाकरे गटाकडून घोषित करण्यात आलेल्या जागांपैकी अनेक जागा अशा आहेत ज्यांवर काँग्रेसने आपला दावा केला आहे. या ठिकाणावरून आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करायचे होते, परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. या जागांमध्ये सांगली आणि मुंबई दक्षिण मध्य लोकसभेच्या जागांचा समावेश आहे.
या जागांवर काँग्रेसचा दावा UBT Candidate List ।
सांगलीच्या जागेवर काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या नावाला पसंती देण्यात आली होती. तर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर अनिल देसाईंची वर्णी ठाकरे गटाकडून लावण्यात आलीय. तर या जागेवर काँग्रेसने वर्ष गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला होता.
दरम्यान, ठाकरे गटाने मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई यांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसला या जागेवरून वर्षा गायकवाड हव्या होत्या. मात्र संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आधीच नाराज आहेत. नुकतेच ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबतची युती आता राहिली नाही. त्याच उद्या महाविकास आघाडी जागा जाहीर करण्या अगोदरच उद्धव गटाने आज आपली यादी जाहीर केलीय. दरम्यान, आपला पक्ष 22 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. सध्या लोकसभेच्या 17 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
पहिल्या यादीत यांचा समावेश UBT Candidate List ।
पक्षाने बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ-वाशीममधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराज निंबाळकर, शिर्डीतुन भाऊसाहेब वाघचौरे, नाशिकमधून राजेराव वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरीतून विनायक राऊत, ठाण्यातून राजन विचारे, मुंबई उत्तर-पूर्वमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई उत्तर-पश्चिममधून अमोल कीर्तिकर आणि परभणीतून संजय जाधव यांचा या यादीत समावेश केलाय.