Aashay Kulkarni| अभिनेता आशय कुलकर्णी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून त्याला लोकप्रियता मिळाली. यानंतर आता आशय स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत झळकणार आहे. सध्या ‘मुरांबा’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. यात आता आशयची यात एन्ट्री झाल्याने मालिकेत आणखी रंगत येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. यात आशय कुलकर्णी हा रेवाच्या आधीच्या प्रियकर असल्याचं समोर येतं. नेहमी काही तरी कारण खोटं बोलणाऱ्या रेवाचं आणखी एक सत्य बाहेर येणार का? याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांना लागून राहिली आहे. यासंदर्भात आशयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “येतोय मुरांबा घेऊन खळबळ करायला…नक्की पाहा…स्टार प्रवाह,” असं लिहित त्याने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेत अभिनेता शशांक केतकर, शिवानी मुंढेकर, प्रतिमा कुलकर्णी, अभिजीत चव्हाण निशाणी बोरुळे, सुलेखा तळवलकर असे अनेक कलाकार आहेत. यातच आता यात आशयची एन्ट्री झाली आहे.
दरम्यान, आशयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’ या मालिकेत आशय झळकला होता. लवकरच तो ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. याशिवाय तो नुकताच व्हिक्टोरिया या चित्रपटात झळकला होता.
हेही वाचा:
Bharti Singh । भारती सिंग ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नवीन सीझनमधून ‘आऊट’